संत वीरशैव कक्कय्या समाजाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन मुंबईत संपन्न !
कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहत नाही :आझाद मैदानावर जोरदार घोषणाबाजी

संत वीरशैव कक्कय्या समाजाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन मुंबईत संपन्न !

कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहत नाही :आझाद मैदानावर जोरदार घोषणाबाजी

मुंबई प्रतिनिधी: अमोल धडके

संत वीरशैव कक्कय्या समाजासाठी शासकीय आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.या मागणीसाठी शुक्रवार दि २८ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संत वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई व महाराष्ट्र राज्यातील ढोर समाजाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला संपूर्ण राज्यातील जिल्हा व तालुक्यातून कानाकोपऱ्यातून ढोर समाज बांधव मोठ्या हजारोच्या संख्येने या आंदोलनास उपस्थित होते.
यावेळी राज्यभरातून आलेल्या आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात “कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय राहत नाही, संत कक्कय्या महाराज की जय,ढोर समाजाचा विजय असो,या जोरदार घोषणानी आझाद मैदान दणाणून गेला.आणि या राज्य सरकारास आंदोलनाच्या माध्यमातून वेठीस धरण्यात आले. याचबरोबर समाजातील विविध भागातून आलेल्या ढोर समाज बांधवांनी स्वतंत्र शासकीय आर्थिक विकास महामंडळ जो पर्यंत संत कक्कय्या समाजास शासन देणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.आंदोलनात महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. भर पावसातही संत कक्कय्या समाजातील बांधव एकजूट होऊन आंदोलन स्थळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतली आंदोलनाची दखल

संत कक्कय्या समाजाने आर्थिक विकास महामंडळासाठी पुकारलेल्या राजव्यापी आंदोलनास आमदार गणेश नाईक व माजी आमदार बाबुराव माने यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच अनुसूचित यादीमधील अनुक्रम १८ नुसार ढोर , डोहोर, कंकय्या आणि कक्कय्या जातीसाठी स्वतंत्र शासकीय आर्थिक विकास महामंडळ ,शासनाने स्थापन करावे ह्या प्रमुख मागणीसहित इतर मागण्यांबाबत विविध गाव,तालुका,जिल्हा येथील सहभागी झालेल्या सर्व बांधवांचा प्रचंड समुदाय आणि त्याचा आक्रोश पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाची दखल घेतली.
दरम्यान वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधान भवन दालनात गेले. या शिष्टमंडळात वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव यशवंत नारायणकर, प्रवक्ते यशवंत शिंदे, सहसचिव सूर्यकांत इंगळे,वीरशैव कक्कय्या समाज मंडळ पुणे अध्यक्ष हनुमंत सोनवणे,समस्त कक्कय्या महासंघ मुंबई निवृत्ती सावळकर ,कक्कय्या समाज संभाजीनगर अध्यक्ष राजकुमार सोनावणे, कक्कय्या समाज पदाधिकारी संभाजीनगर सोनोपंत कावळे, कक्कय्या समाज पदाधिकारी संभाजीनगर दिग्विजय शेरखाने, बहुद्देशीय ढोर समाज डोंबिवली मंडळ अध्यक्ष अशोक कटके,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सचिव गोविंद खरटमल, पत्रकार दत्ता खंदारे,पत्रकार अमोल धडके,पत्रकार गणपत शिंदे,हेमंत शेरखाने,सुनील शिंदे म्हसवड,गणेश नारायणकर कोल्हापूर,काँग्रेस राज्य सदस्य प्रतीक्षा ताई सोनवणे,विश्वनाथ सोनवणे मिरज,दीपक सावळकर,यांचा सहभाग होता. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून सांगितले की संत वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ शासनाने स्थापन करावे व ढोर समाजाचे इतर मागण्या मान्य कराव्यात अशी व्यथा समाजाच्या वतीने आमदार यांनी केले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतपणे सर्व गोष्टी ऐकून घेतले. तसेच माझ्या वतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नेमणूक करत आहे.ते तुमचे समस्या जाणून घेतील.आणि मला सांगतील यावेळी दीपक केसरकर यांनी भेट झाली त्यांना कक्कय्या मागण्याबाबत ४ पानी निवेदन देण्यात आले.तुमच्या मागण्याबाबत या अधिवेशन मध्ये १० जुलै २०२४ रोजी आर्थिक नियोजन समितीची बैठक असणार असून त्यामध्ये हा विषय घेऊन वरच्या सभागृहात मंजूर करून अधिवेशनाच्या अतीम दिवशी १२ जुलै २०२४ रोजी याबाबतची घोषणा केली जाईल.असे आश्वासन केसरकर यांनी दिले.