राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत परीक्षक म्हणून बेंडभर, परदेशी आणि कदम पुण्यात काव्य गायन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन ता. 13 (पुणे प्रतिनिधी) सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 55 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातील आघाडीचे साहित्यिक सचिन बेंडभर, कवी मनोहर परदेशी आणि कवी अनिल कदम यांची निवड करण्यात आली होती. यावेळी कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे येथील एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय, गोळीबार मैदान येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को.ऑप.क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेचे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, मुख्याध्यापक संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष व सेकंडरी सोसायटीचे संचालक तुकाराम बेनके यांनी काव्य गायन स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन केले. त्यावेळी कवी मनोहर परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिन बेंडभर यांनी आलेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 55 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातील आघाडीचे साहित्यिक सचिन बेंडभर, कवी मनोहर परदेशी आणि कवी अनिल कदम यांची निवड करण्यात आली होती. यावेळी कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिक्षक साहित्यिकांनी निसर्ग, नातेसंबंध, सामाजिक, राजकीय, वाढते शहरीकरण आदी विषयांवर कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव गवळे यांनी केले. तर तुकाराम बेनके यांनी आभार मानले.