आळगे येथे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ज्योत जागवणारा एक प्रेरणादायी उपक्रम
आळगे —१४ एप्रिल २०२५ रोजी, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, कन्नड, उर्दु शाळा आळगे येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गड्डेप्पा शिवयोगी कोरे (SMC अध्यक्ष) होते आणि प्रतिमा पूजनाचे सौभाग्य श्री. संतोष कुमार संगणा चराटे (SMC उपाध्यक्ष) यांना लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे “भारताचे संविधान” या विषयावर आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा होती.
लहान गट (इ. १ ते ५) आणि मोठा गट (इ. ६ ते ७) अशा दोन गटांमध्ये घेतलेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे बीजारोपण झाले.
विशेष बाब म्हणजे प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना “भारताचे संविधान” हे पुस्तक बक्षिस म्हणून देण्यात आले, जे विद्यार्थ्यांना फक्त बक्षिस न राहता भारतीय लोकशाहीचा पाया समजून घेण्याचे साधन ठरेल.
यावेळी मनात आठवण झाली, डॉ. बाबासाहेबांना त्यांचे गुरू केळूसकर गुरुजींनी भेट दिलेले ‘बुद्धचरित्र’ पुस्तक, ज्याने त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकला. आज, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या पुस्तकाचे बक्षीस हे त्या प्रेरणेचीच पुनरावृत्ती आहे!
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या अमर वाक्याचा प्रभाव आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवशंकर लक्ष्मण हत्तुरे सर यांनी केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षकवृंद:
मुख्याध्यापक गुरुनाथ बिराजदार सर
नि. ल. कोळी सर, सकलेश्वर पुजारी सर, सूरज उईके सर
कन्नडचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर, प्रभूलिंग मेळकुंदे सर
उर्दूचे मुख्याध्यापक श्री. शेख सर, कुमठे मॅडम, शेख मॅडम
आभार प्रदर्शन श्री. सकलेश्वर पुजारी सरांनी केले.
—
कौतुकाचे शब्द:
विद्यार्थ्यांनी दिलेले विचार हे भारताच्या उज्वल भविष्यासाठी आशादायक आहेत.
—
अशा उपक्रमांमुळे केवळ स्पर्धा होत नाही, तर संविधान आणि लोकशाहीचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रोवले जाते. ही बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे.📚📚🖊️🖊️👏👏