-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक उत्तुंग, प्रखर बुद्धिवान, समाजउद्धारक, बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचा महामानव ; सुधीर सोनकवडे
वागदरी — येथील संत कक्कया सभागृहात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी मुख्याध्यापक सुधीर सोनकवडे, माजी सरपंच रवी वरनाळे,नरसिंग मोहरकर, मल्लिनाथ बंदिछोडे, राजकुमार हुग्गे,गोपी सावंत,नाना शिंदे सह आदि मान्यवर उपस्थित होते..
यावेळी बोलताना सोनकवडे म्हणाले भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजनितिज्ञ आणि समाजसुधारक होते. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय संविधानातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे म्हटले जाते. डॉ. आंबेडकर आणि तासनतास अखंड अभ्यास, असे समीकरण आहे. सलग अठरा अठरा तास अभ्यास करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
Back to top button
×
No WhatsApp Number Found!