सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हे पण नेते सोबत !
स्थानिक बाजार समिती निवडणूक

सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हे पण नेते सोबत !
सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हे पण नेते सोबत !
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, शहाजी पवार, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आले आहेत. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती.

सोमवारी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेऊन केली. आमदार कल्याणशेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्वत्र एकत्र येऊन लढविणार असल्याचे घोषित केले. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील. 16 एप्रिल रोजी आमच्या पॅनल ची घोषणा होईल असेही ते म्हणाले. आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे, मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही असे आमचे मत आहे. बापू सोबत यावेत ही इच्छा आहे त्यांनी यावे असे मी आवाहन करतो.

दिलीप माने म्हणाले, आम्ही सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक करतोय, बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे म्हणून हा निर्णय घेतला.
