बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे ..कल्याणशेट्टी महाविद्यालयात निर्भया पथकाचे आवाहन
उपक्रम

बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे ..कल्याणशेट्टी महाविद्यालयात निर्भया पथकाचे आवाहन

अक्कलकोट

विकृत प्रवृत्ती, बाल लैंगिक अत्याचार करत आहेत त्यामुळे समाजाची घडी विस्कटली आहे, अशा स्थितीत शिक्षकांनी प्रबोधनाची भूमिका घ्यावी असे मत निर्भय पथकातील पोलीस अधिकारी ज्योती गाजरे यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी हे होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.

पुढे बोलताना ज्योती गाजरे म्हणाल्या की, पॉक्सो कायदाची अंमलबजावणी जलद गतीने होत आहे परंतु काही समाजद्रोही व्यक्तींना या कायद्याची भीती वाटत नाही. राजरोसपणे ते लहान मुलींवर अत्याचार करत आहे, अशा प्रवृत्तींच्या व्यक्तींचे प्रबोधन शिक्षकांनी केले पाहिजे. व्यापक चळवळ उभारून समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तींवर जरब निर्माण व्हावी म्हणून पॉक्सो कायद्यातील तरतुदी सांगितल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना देखील कायदा समजून सांगितला पाहिजे.

सना मियावाले म्हणाल्या की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देताना त्याचा दुरुपयोग करू नका असा सल्ला दिला पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप व गुगलचा वापर ज्ञान घेण्यासाठी झाला पाहिजे, परंतु त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. हे होऊ नये यासाठी शिक्षकानी पुढाकार घेतला पाहिजे.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, समाजाची स्थिती विकोपाला गेली आहे. दैनंदिन जीवन जगत असताना दररोज नवीन गुन्हेगारीचे स्वरूप समाजासमोर येत आहे. बाल लैंगिक गुन्हेगारी वाढत आहे. त्यावर प्रबोधन हा एकमेव उपाय आहे ते सर्वांनीच केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्राध्यापिका शितल झिंगाडे भस्मे यांनी केले तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले
कार्यक्रमास प्राध्यापिका शिल्पा धूमशेट्टी, शितल फुटाणे, जनाबाई चौधरी, महेश जोगदे यांच्यासह विद्यार्थिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
पॉक्सो कायदा पुस्तिका नियमावलीचे अध्ययन करावे
पॉक्सो कायदा पुस्तिका मध्ये सविस्तर बाल लैंगिक गुन्हे कायद्याचे विश्लेषण केले आहे. त्याचे अध्ययन शिक्षकांनी केले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना देखील कायद्याचे ज्ञान दिले पाहिजे असे निर्भय पथकाने सांगितले.
फोटो ओळ
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात मार्गदर्शन करताना निर्भय पथकातील पोलीस अधिकारी ज्योती गाजरे व्यासपीठावर मल्लिनाथ कल्याणशेट्टी मान्यवर.