स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

हजारो दिपोत्सवाने उजळले वटवृक्ष मंदीर व भक्त निवासत्रि पुरारी पौर्णिमेची संध्या दिपोत्सवाने साजरी

नयन मनोहरी दिपोत्सवाने उजळलेले मंदीर परिसर व भक्त निवास परिसर दिसत आहे.

हजारो दिपोत्सवाने उजळले वटवृक्ष मंदीर व भक्त निवास

HTML img Tag Simply Easy Learning    

त्रिपुरारी पौर्णिमेची संध्या दिपोत्सवाने साजरी

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, व मुंबई पुण्यातील स्वामी भक्त यांच्या वतीने येथील वटवृक्ष मंदीर व देवस्थानच्या भक्त निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. लगभग हजारो दिव्यांच्या दिपोत्सवात उजळलेले मंदीर परिसर व भक्त निवासाचे नयन मनोहरी दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे व लक्षवेधी ठरले. या दिपोत्सवाचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व ब्रम्हांड नायक चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश गोवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी द्वापार युगापासूनच हिंदू धर्मात दिपोत्सवास मानाचे स्थान आहे. मानवी जीवनातील अंधकार दूर होवून जीवनात नवचैतन्य निर्माण होण्याकरीता हा दिपोत्सव पुर्वापार परंपरेनुसार साजरा होत आला आहे. दिपावली व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आजही राज्यभरातील अनेक भाविक येथे एकत्र येवून जीवनातील अंधकारमय विचारसारणीवर मात करून जीवनात नवचैतन्य प्राप्त करण्याकरीता या दिपोत्सवाच्या माध्यमातून स्वामींचे आशिर्वाद घेवून खऱ्या अर्थाने जीवन सुख समृध्द करून घेतात असे भावोद्गार व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विजयकुमार कडगंची, राजेश गोवर्धन, संजय पाठक, महादेव तेली, चंद्रकांत गवंडी, शिवशरण अचलेर, रवि मलवे, गिरीश पवार, मल्लीनाथ बोधले, रमेश घोसले आदींसह उस्मानाबाद, पुणे, मुंबई, बार्शी येथून पायी चालत आलेले अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – नयन मनोहरी दिपोत्सवाने उजळलेले मंदीर परिसर व भक्त निवास परिसर दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button