गावगाथा

स्वरपंचम प्रस्तुत भक्ती संगीतात सुमधुर गायनाने श्री.वटवृक्ष मंदीर व उपस्थित भाविक मंत्रमुग्ध.

स्वामी समर्थांचा १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकीर्तन महोत्सवात गायिका कल्याणी देशपांडे व सहकाऱ्यांच्या भक्तीगीतांनी गुंफले दुसरे पुष्प.

स्वरपंचम प्रस्तुत भक्ती संगीतात सुमधुर गायनाने श्री.वटवृक्ष मंदीर व उपस्थित भाविक मंत्रमुग्ध.

स्वामी समर्थांचा १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकीर्तन महोत्सवात
गायिका कल्याणी देशपांडे व सहकाऱ्यांच्या भक्तीगीतांनी गुंफले दुसरे पुष्प.

HTML img Tag Simply Easy Learning    

(अ.कोट. दि.१४/०४/२०२५)
मुंबई येथील प्रशांत देशपांडे यांच्या स्वर पंचम प्रस्तुत भावभक्ती गीत व भक्तीसंगीताच्या मैफीलीतून झी मराठी वाहिनीवरील अवघा रंग एक झाला व स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार फेम गायिका कल्याणी देशपांडे, गायक राजू काजे, रविंद्र शाळू, ओवी काजे यांनी अभंगगीते व भावभक्तीगीतांच्या माध्यमातून स्वामी भक्तांना श्री.विठ्ठल व श्री.स्वामी समर्थ, आई तुळजाभवानीच्या भक्तीचे दर्शन घडवत भक्तीच्या आनंदामध्ये उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील दुसरे पुष्प गायिका कल्याणी देशपांडे व सहगायकांनी भक्तीगीतांनी व भक्तीसंद्या कार्यक्रमाने गुंफले. या कार्यक्रमात गायिका कल्याणी देशपांडे यांनी श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करताच उपस्थित भक्तांनी उत्साहपुर्ण स्वरातून गायिका कल्याणी देशपांडे यांच्या तारकमंत्र सुरात सुर विलीन केले. श्रोत्यांचा हा उत्साह शेवटपर्यंत कायम होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे यांच्या मुख्य उपस्थितीत समितीचे चेअरमन महेश इंगळे व कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले बाळू मामा यांचे वंशज मनोहर मामा (महाराज) यांच्या हस्ते गायिका कल्याणी देशपांडे, निर्माते प्रशांत देशपांडे, राजू काजे, रवींद्र साळू, ओवी काजे, कार्यक्रमाचे निरूपणकर मंगला खाडीलकर या सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाच्या सुरवातीस मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी सर्व मान्यवर कलाकारांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले .पुढे या भक्ती संगीत सेवेत गायिका कल्याणी देशपांडे, राजू काजे, रविंद्र शाळू, ओवी काजे यांनी अत्यंत लयबद्ध स्वरात देवाचिया द्वारी, तुज मागतो आता, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, विठू माऊली तु माऊली जगाची, मोगरा फुलला, सुर सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, कानडा राजा पंढरीचा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, अबीर गुलाल उधळीत रंग, माय भवानी तुझे लेकरू, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, फिरत्या चाकावर मातीला देई आकार, शोधिसी मानवा राऊळी मंदीरी, निघालो घेऊनी दत्तांची पालखी, जय जय स्वामी समर्थ म्हणा अशी एकाहून एक सरस भावभक्तीगीते सादर करून भक्तीगीतं गात स्वामी दरबार आनंदीत व भक्तीमध्ये मंत्रमुग्ध केले. या भक्ती संगीत गायन सेवेत त्यांना तबल्यावर करण भोसले, पखवाजवर पवन व्हनकडे, किबोर्डवर दर्शन बासुतकर, टाळवर नंदकुमार रानडे, हार्मोनियमवर ओंकार पाठक या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट व तालबद्ध साथ संगत केली. यावेळी संत बाळू मामा यांचे वंशज मनोहर मामा महाराज, प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, गणेश दिवाणजी,
प्रा.शिवशरण अचलेर, सुनिल कटारे,
ज्ञानेश्वर भोसले, उद्योगपती सचिन किरनळ्ळी, शिवपुत्र हळगोदे, डॉ.मल्लीनाथ बोधले, दर्शन घाटगे, अविनाश क्षीरसागर, श्रीकांत मलवे, लखन सुरवसे, मोहन जाधव, सागर गोंडाळ, स्वामीनाथ लोणारी, प्रकाश कासेगांवकर, संजय बडवे, सुरेखा तेली, लता पाठक, अनुप्रिया औसेकर, पंकजा देसाई, किरण पुजारी, प्रतिभा भातंब्रेकर आदींसह अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून या भक्ती संगीत श्रवणाचा भक्तीमय आनंद घेतला.

फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील धर्मसंकीर्तन महोत्सवात भक्ती संगीतसेवा गायनसेवा सादर करताना मुंबई येथील स्वरपंचमच्या गायिका कल्याणी देशपांडे, मंगला खाडीलकर व सहकलाकार दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button