*शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी डाॅ. आंबेडकरांचे विचार अंगीकारले पाहीजे- डाॅ. एस.सी. आडवितोट*
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महापुरुषाविषयी जागृती निर्माण करणे आज गरजेचे आहे. असे प्रतिपादन सी.बी.खेडगीज काॅलेज चे प्राचार्य डॉ.एस.सी.आडवितोट यांनी केले. सी.बी. खेडगीज काॅलेज मध्ये संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री बसलिंगप्पा खेडगी साहेब यांच्या प्रेरणेने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ” भारताचे संविधान उद्देशिका ” सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.गणपतराव कलशेट्टी यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. सौ. वैदेही वैद्य यांनी डाॅ. बाबासाहेबांच्या जीवन व विचारांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा.डाॅ.किशोर थोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागातील प्रा.डाॅ. विठ्ठलराव मखने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरीष्ठ, कनिष्ठ व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत हजर होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!