

केडगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा द्यावा – जन संघर्ष संघटनेची मागणी

पुणे : दौंड रेल्वे स्थानकानंतर केडगाव रेल्वे स्थानक हे मोठे स्थानक असून येथे दररोज अनेक प्रवासी मुंबई, सोलापूर, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी प्रवास करतात. मात्र, सध्या या स्थानकावर फारशा गाड्यांचा थांबा नसल्यामुळे प्रवाशांना पुणे किंवा दौंडला जावे लागते, अशी माहिती जन संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. प्र. ने. शानदेव शेलार यांनी दिली.

त्यांच्या मते, केडगाव स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी असून त्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गाड्यांचा थांबा येथे द्यावा. यात खालील गाड्यांचा समावेश आहे:

- 11025/11026 अमरावती – पुणे एक्सप्रेस
- 11077/11078 पुणे – जम्मू तवी – पुणे एक्सप्रेस
- 11410 निजामाबाद – पुणे एक्सप्रेस
या गाड्यांचा थांबा केडगाव स्थानकावर देण्यात आल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि वेळ व पैशांची बचत होईल. तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या नवीन गाड्यांना देखील केडगाव स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
