डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या रॉल्स रॉयसी या ऐतिहासिक वाहनाचे अक्कलकोटमध्ये महेश इंगळे यांच्या हस्ते पुजन.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरचे उद्योगपती किसन कसबे यांनी प्रदर्शनानिमित्त जयपूरहून आणले रॉल्स रॉयसी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या रॉल्स रॉयसी या ऐतिहासिक वाहनाचे अक्कलकोटमध्ये महेश इंगळे यांच्या हस्ते पुजन.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरचे उद्योगपती किसन कसबे यांनी प्रदर्शनानिमित्त जयपूरहून आणले रॉल्स रॉयसी

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१६/०४/२०२५)
राजस्थान जयपूर येथील संस्थानकडे वारसात्मक मालमत्ता असलेल्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या सन १८६७ सालचे ऐतिहासिक मॉडेल रॉल्स रॉयसी हे चारचाकी वाहन सोलापूरचे उद्योगपती केतन कसबे यांनी अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रदर्शनानिमीत्त सोलापूर येथे आणले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केतन कसबे यांनी ही गाडी अक्कलकोटला आणल्यानंतर येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने समितीचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी या ऐतिहासिक वाहनाची मनोभावे पुजा करून श्री.स्वामी समर्थांचे प्रसाद अर्पण केले. यावेळी केतन कसबे यांच्या आग्रहानिमीत्त्त महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, अक्कलकोट महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराया आडवितोट व स६ यांनी या ऐतिहासिक वाहनातून अक्कलकोट शहरात फेरफटका मारला. यानंतर भिम नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती येथे भेट देवून महेश इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने समितीचे प्रमुख अविनाश मडीखांबे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपले भिमनगर येथील समाज बांधव व अक्कलकोट वासीयांकडून नेहमीच उत्साहात साजरी होत असते. सोलापूरचे उद्योगपती केतन कसबे हेही स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत. याचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात वापरलेली सन १८६७ सालच्या ब्रिटीश मॉडेलची रॉल्स रॉयसी हे चारचाकी वाहन त्यांनी आज येथे प्रदर्शनानिमीत्त आणली आहे. हे वाहन आज आपल्या येथेच पाहून माझ्यासह सर्व अनुयायींना खूप आनंद व समाधान लाभले आहे असे सांगून सध्या हे वाहन राजस्थान येथील जयपुर पॅलेसच्या हेरिटेज (वारसा) येथे स्थानापन्न आहे अशी माहिती देऊन केतन कसबे यांच्या या उपक्रमांस धन्यवाद दिले. याप्रसंगी अविनाश मडीखांबे, केतन कसबे, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर,
डॉ.शिवराया आडवितोट, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, प्रथमेश इंगळे, दर्शन घाटगे, सुनील पवार, खाजप्पा झंपले,
आदीत्य गवंडी व अन्य उपस्थित होते.

फोटो ओळ – रॉल्स रॉयसी या वाहनाचे पूजन करताना महेश इंगळे व महेश इंगळे यांचा सत्कार करताना अविनाश मडीखांबे
व अन्य दिसत आहेत.
