वागदरी येथे आगीमुळे एक एकर ऊस सह तीन लाखाचे नुकसान
वागदरी तालुका अक्कलकोट येथे शेतात लागलेल्या आगीमुळे अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतात अचानक रात्री लागलेल्या आगीमुळे शिवशरण यमाजी यांची एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. तर सिद्रामप्पा यमाजी यांची 25 नारळाचे झाड आगीमुळे जळून भस्म झाले आहेत. सिद्धाप्पा यमाजी व धोंडप्पा यमाजी यांची केबल पाईप स्पिंकलर पाईप ठिबक सिंचन विद्युत मोटार शेती अवजारे सह 80 ते 90 हजार रुपयांचे साहित्य जळून भस्म झाला आहे. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आग विजवणे अशक्य होते या आगीमुळे वागदरी व शिरवळवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गाव महसूल अधिकारी राजकुमार कोळी महसूल सेवक फिरोज तांबोळी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे