ठाण्याच्या पायल नृत्य नाट्य निकेतनच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध
तमन्ना नायर व सहकलाकारांच्या नृत्याविष्काराने बहरले धर्मसंकीर्तन महोत्सव

ठाण्याच्या पायल नृत्य नाट्य निकेतनच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध
तमन्ना नायर व सहकलाकारांच्या नृत्याविष्काराने बहरले धर्मसंकीर्तन महोत्सव
(श्रीशैल गवंडी, दि.१८/०४/२०२५.अकोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवात आज ठाण्याच्या पायल नृत्य नाट्य निकेतनच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यम नृत्याविष्कारातून पायल नृत्य नाट्य निकेतनचे कलाकार तमन्ना नायर व सहकलाकारांनी ताल व लयबद्ध भरतनाट्यम नृत्याविष्कारातून धर्मसंकीर्तन महोत्सवाचे पाचवे पुष्प आपल्या कौशल्यात्मक नृत्याविष्काराने गुंफले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी तमन्ना नायर व सहकलाकारांना श्री स्वामी दर्शनाचा लाभ घडवून सर्व कलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. या भरतनाट्यम नृत्याविष्कारात तमन्ना नायर व तमन्ना मुर्डेश्वर, अथर्व चौधरी, मेघना गोडसे, श्रेया चिमणकर, अंकिता सावंत, अंजलीना सेबस्तीयन, स्मिता नायर, अनिता शानभाग,
अरुणा पांचाल, अश्विनी जोशी, कीर्ती बुद्धीसागर या सहकलाकारांनी एकेरी व सामुहीक नृत्याविष्कारातून गणेश कीर्तनम, शिव कीर्तनम, अभंग येही हो विठ्ठल्ले, हरी म्हणा, नामदेव कीर्तन या अभंग व कीर्तन गीतांवर सुरेख हस्त व पदलालीत्यातून नृत्याविष्कार सादर करून उपस्थित भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर सूरदासांचे भजन श्याम तोरी मुरली नेक बाजाऊ या भजनावर स्वतः गुरू तमन्ना यांनी त्यांचे शिष्य अथर्व चौधरी यांच्या समवेत सादर केलेला कलात्मक नृत्याविष्कार या भरतनाट्यम नृत्यसेवेचा मेरूमणी ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्रावर सर्व कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याविष्कारातून नृत्याविष्कार सेवा स्वामी चरणी समर्पण करून या भरतनाट्यम नृत्य सेवेची सांगता केली. या भरतनाट्यम नृत्यसेवेत या कलाकारांना मृदंगमवर श्री. आर.शक्तिधरन, गायनावर विष्णुदास मनालार, बासुरीवर राघवेंद्र बालिगा, रंगभूषा राजी शक्तिधरन, संस्था संचालक उदय मुर्डेश्वर, गुरू तमन्ना मुर्डेश्वर यांनी साथ संगत केली. स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. याप्रसंगी मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे, मोहनराव पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, ओंकार पाठक, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, शिवपुत्र हळगोदे, सुनिल कटारे, मनोज इंगुले, श्रीशैल गवंडी, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, बंडोपंत घाटगे, आदीत्य गवंडी, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, प्रकाश कासेगांवकर, अभिषेक गवंडी, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, चंद्रकांत गवंडी, गिरीश पवार, सचिन हन्नूरे, लखन सुरवसे, सिध्दार्थ थंब, विजयकुमार कडगंची, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, खाजप्पा झंपले, महेश मस्कले, संतोष पराणे, प्रसाद सोनार, संतोष जमगे, महादेव तेली यांच्यासह राज्याच्या कानाकोपरयातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्तांनी उपस्थित राहून हा भरतनाट्यम नृत्याविष्कार सेवा पाहण्याचा लाभ घेतला.

फोटो ओळ – श्री.वटवृक्ष मंदीरातील धर्मसंकीर्तन महोत्सवात भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करताना तमन्ना नायर व सहकलाकार दिसत आहेत.
