गावगाथा

Jammu Kashmir terrorist attack : जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला ; आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू ….पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर सुरू

(प्रतिनिधी ): जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी देखील झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 20 हून अधिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. मृतांचा आकडा वाढू शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून दिल्लीहून श्रीनगरला रवाना झाले आहेत.

 

अनंतनाग पोलिसांनी गरजूंना तात्काळ मदत आणि माहिती देण्यासाठी पोलिस कंट्रोल रूममध्ये 24/7 आपत्कालीन मदत कक्ष स्थापन केला आहे. हा मदत कक्ष दिवसरात्र कार्यरत असणार आहे. असे अनंतनाग पोलिसांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले.

संपर्क क्रमांक : ९५९६७७७६६९ | ०१९३२२२५८७० | व्हॉट्सअॅप क्रमांक : ९४१९०५१९४०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button