वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमीत्त जय्यत तयारी.
श्री.स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमीत्त शनिवारी अक्कलकोट शहरातून श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक पालखी सोहळयाचेही आयोजन.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमीत्त जय्यत तयारी.
श्री.स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमीत्त शनिवारी अक्कलकोट शहरातून श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक पालखी सोहळयाचेही आयोजन.
दि.२५ एप्रिल रोजी धर्मसंकीर्तन व भजनसेवेची सांगता तर दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामवीणा समाप्ती सोहळा.
(श्रीशैल गवंडी, दि.२३/०४/२०२५.अ.कोट) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मुळस्थान) येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४७ वा पुण्यतिथी उत्सव शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व अखंड भक्तीभावात मंदीर समितीच्या वतीने साजरा करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
पुण्यतिथी दिनी पहाटे २ वाजता काकड आरती होईल. तदनंतर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण होईल. पहाटे ३ ते ५ या वेळेत नगर प्रदक्षिणा पार पडेल. देवस्थानच्या वतीने श्रींना पारंपारिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता करण्यात येईल. सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या भजनाने देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा सकाळी ७ वाजता होईल. तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी दि.२५ एप्रिल रोजी धर्मसंकीर्तन व भजनसेवेची सांगता होईल. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी रोजी
सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मुरलीधर मंदीर येथील परिसरात तसेच दक्षिण महाद्वारलतच्या दर्शन रांग परिसरात कापडी मंडप व बॅरेकेटींग करुन कायम स्वरूपी दर्शन रांग करण्यात आलेले आहे. वाढत्या गर्दीचे स्वरूप पाहून गेल्या कांही महीन्यांपासून मंदीरात पुरूष, महिला भक्तांना व विकलांग, वयोवृद्ध भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात येत आहे. याची अंमलबजावणी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी रोजीही करण्यात येईल. मंदीरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक भाविकांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता श्री स्वामी पुण्यतिथी रोजी बंद ठेवण्याचे निर्णय मंदीर समितीने घेतला आहे. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. सकाळी ११ वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती, ११:३० वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. महानैवेद्य श्रींना दाखविण्यात येईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृहात सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे. सायंकाळी ५:३० ते रात्री १० या वेळेत श्रींचा सजविलेला सवाद्य पालखी मिरवणुक सोहळा वटवृक्ष मंदिरातुन निघेल. पालखी मार्ग फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक, दक्षिण पोलीस स्टेशन समोरून मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्ली असे असेल. वटवृक्ष मंदिरात रात्री १० वाजता पालखी सोहळा आल्यानंतर देवस्थानच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना शीरा प्रसाद वाटप करणेत येईल. रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत मंदिरात गोपाळकाला होवून श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल. दिनांक २८ एप्रिल वार सोमवार रोजी मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृह येथे सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, भजनकरी, विणेकरी, प्रभात फेरीस येणारे भाविक, पारायणास बसलेले भाविक, देवस्थान कर्मचारी, सेवेकरी, सर्व पोलीस कर्मचारी, यांना दुपारी १२ ते ३ या वेळेत भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे, तरी सर्वांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा, पालखी सोहळा सेवेचा, व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
