गावगाथा

मौजे लोणी भापकर ता.बारामती येथील स्म्शानभूमीची अतिशय बिकट दुरावस्था झालेली आहे ,त्याचे तत्पर सुशोभीकरण करावे –दादा बबन कडाळे

बारामती तालुकाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य मागणी

मौजे लोणी भापकर ता.बारामती येथील स्म्शानभूमीची अतिशय बिकट दुरावस्था झालेली आहे ,त्याचे तत्पर सुशोभीकरण करावे –दादा बबन कडाळे

मौजे लोणी भापकर ता.बारामती येथील स्म्शानभूमीची अतिशय बिकट दुरावस्था झालेली आहे ,त्याचे तत्पर सुशोभीकरण करावे अशी मागणी श्री. दादा बबन कडाळे बारामती तालुकाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य हे करत आहेत ..

मौजे लोणी भापकर ग्रामपंचायतचे स्मशानभूमीकडे दुर्लक्षित असल्याचे विचित्र चित्र दिसून येत आहे . सदर स्म्शान भूमी मध्ये घनदाट काटेरी मोठं मोठी वृक्ष मोठ्या डौलाने उभी आहेत.अनावश्यक काटेरी झुडपे असून त्यामध्ये स्वापद हिंस्त्र पशु वावर करतात. जेव्हा रात्र बेरात्री शव,प्रेताची अंत्यविधी करायची वेळ असते तेव्हा,नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

स्मशान भूमीच्या सुविधांची जाणीव ठेऊन देखरेख आणि दुरुस्ती करिता लोणी भापकर ग्रामपंचायत ने तत्परता दाखवायचे सोडून दुर्लक्षित केलेले दिसून येत आहे .

स्मशान भूमी चा संपूर्ण परिसर स्वछ करून सौंदरीकरणं करावे अशी मागणी श्री. दादा बबन कडाळे बारामती तालुकाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली . लवकरच ते स्मशान भूमीच्या दुरुस्ती साठी व सुशोभीकरण करण्यासाठी प्रशासनास निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करणार आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button