गावगाथा

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातल्या धर्मसंकिर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.संदीप बुवा मांडके यांचे निरूपण.

हिंदू धर्म संरक्षण पालन करण्याचे संस्कार आपल्या भावी पिढींना द्यावे.

हिंदू धर्म संरक्षण पालन करण्याचे संस्कार आपल्या भावी पिढींना द्यावे.

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातल्या धर्मसंकिर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.संदीप बुवा मांडके
यांचे निरूपण.

(अ.कोट,श्रीशैल गवंडी,दि. २४/०४/२५) आपले सनातन हिंदू धर्म हे जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, म्हणूनच आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीमुळे आपल्या हिंदू धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. हीच दूरदृष्टी कायम ठेवून हिंदू धर्माचे संरक्षण व पालन करण्याचे संस्कार आपण आपल्या भावी पिढींना देण्याचे कार्य देशातील तमाम हिंदू नागरिक भाविकांनी करावे असे भावनिक आवाहन पुण्यातील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.संदीप बुवा मांडके यांनी केले. ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेत कीर्तन सेवेच्या माध्यमातून धर्मसंकीर्तन महोत्सवाचे ११ वे पुष्प गुंफून निरूपण करताना बोलत होते. कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार ह.भ.प.संदीप बुवा मांडके व सहवादकांचे श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या कीर्तन सेवेत पुढे निरूपण करताना कीर्तनकार ह.भ.प.संदीप बुवा मांडके यांनी कीर्तन सेवेच्या पूर्व रंगात हिंदू धर्माचे रक्षण व पालन करणे यासारखे मोठे कर्तव्य जीवनात कोणतेच नाही, याकरिता त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, नाही भीड भाड ……नाही भीड भाड, तुका म्हणे आम्हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन
हा अभंग वदून त्यांनी उत्तम विवेचन केले.
जे देहु गावी जन्मा येऊन सदेह वैकुंठं गेले ते संत तुकाराम म्हणतात आपला हा हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे, म्हणूनच सर्व देवदेवतांनी साधू संतांनी या सनातन धर्मात व भारत भुमीवरच जन्म घेतला आहे, तो आपल्या धर्माच्या उद्धारासाठीच म्हणून संतांनीही त्याच उपदशाने आपल्या पुर्वजांना धर्मविस्ताराकरिता मार्गदर्शन केले आहे.
पुढे किर्तन सेवेच्या उत्तर रंगात ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांनी मूळ विषयाला अनुसरून ‘भीमाचे गदा युद्ध’ असे सुंदर आख्यान लाऊन देह काळाचे, धन कुबेराचे
देह शुद्ध करुंनी भजनी भजावे,
आणि त्यांचे आठवावे दोष गुण या अभंगाद्वारे देह हा मानवासाठी काळाचा ठेवा आहे. धनरुपी आत्मा ही भगवंताची म्हणजेच कुबेराची मालमत्ता आहे, त्यामुळे आपल्या मनातून अहंकाराला परावृत्त करून देह शुद्ध ठेवून मनी भजनी भजावे व आपल्या अंगी असलेल्या अहंकाराला
पूर्णविराम द्यावा कारण शुद्ध व निरोगी देहातच देवत्व आहे म्हणून सर्वांनी नियमितपणे सर्व संतांचे, पांडुरंगाचे, श्री स्वामी समर्थांचे नियमितपणे नामस्मरण करून या नामरुपी आत्मचिंतनाने आपले देह शुद्ध करावे व या देहनामक मंदिरात भगवंत रुपी आत्म्याची निर्मिती करावी असेही निरूपण करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकत कीर्तन सेवेची सांगता केली.
या कीर्तन सेवेत आर्या, साकी या सारख्या काव्य प्रकारांचा समावेश होता. या कीर्तन सेवेत ह.भ.प.संदीप बुवा मांडके यांना तबल्यावर रविंद्र क्षीरसागर, हार्मोनियमवर प्रशांत देशपांडे, ऑर्गनवर ओंकार पाठक, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, श्रीमुख जगदाळे प्रा.नागनाथ जेऊरे, विजयकुमार कडगंची, मनोहर देगांवकर, मयुर स्वामी, अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सैदप्पा इंगळे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, आदीत्य गवंडी, प्रकाश कासेगांवकर, शिवपुत्र हळगोदे, ज्ञानेश्वर भोसले, विपूल जाधव, अविनाश क्षीरसागर, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, प्रा.शिवशरण अचलेर, दिपक जरिपटके, प्रसाद पाटील, श्रीशैल गवंडी, महेश मस्कले, मोहन जाधव, प्रसाद सोनार, मोहन शिंदे, बंडेराव घाटगे, नरसिंग क्षीरसागर, संजय बडवे, चंद्रकांत गवंडी, सुनिल कटारे, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, महेश मस्कले आदींसह मोठया संखेने स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तन श्रवण सेवेचा आनंद लुटला.

फोटो ओळ – श्री. वटवृक्ष मंदिरातल्या धर्मसंकीर्तन महोत्सव व्यासपीठावर कीर्तन सेवा सादरीकरण करताना ह.भ.प.संदीप बुवा मांडके व सहवादक दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button