गावगाथा

जम्मू कश्मिर येथील पहगलाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट वासियांकडून तीव्र निषेध

जम्मू कश्मिर येथील पहगलाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करताना अक्कलकोटवासी दिसत आहेत.

जम्मू कश्मिर येथील पहगलाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट वासियांकडून तीव्र निषेध

(अक्कलकोट, दि.२३/४/२०२५)
जम्मू कश्मिरच्या अनंतनाग जिल्हयातील पहगलामच्या बैसरन व्हॅली येथील हिंदू बांधवावरील अतिरेकी संघटनेच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथील हुतात्मा चौक येथे अक्कलकोट वासियांकडून निषेध व्यक्त करीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या जयघोषात तीव्र आंदोलन केले. या प्रसंगी बोलताना संतोष वगाले यांनी पहलगाम येथील अतिरेकींचा भ्याड हल्ला म्हणजे देशातील हिंदू धर्मावरच झालेला आघात आहे. या हल्ल्यामध्येनांव व धर्म विचारुन पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू धर्मातील आपल्या बंधू भगिनींवर बेछूट गोळीबार करण्यात आले आहे. या हल्ल्यात आपल्या बंधू भगिनींसह कांही विदेशी पर्यटकांनासुध्दा आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलीन झाली आहे, तसेच कश्मिर पर्यटन संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, त्यामुळे भारत सरकारच्या वतीने या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून हल्लेखोरांवर त्वरीत कठोर कारवाई करावी याकरीता संपूर्ण देशवासियांच्या वतीने व अक्कलकोट वासियांच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल्याचे सांगून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या माझ्या बंधू भगिनींच्या आत्म्यास चिरशांती लाभावी व त्यांच्या कुटूंबियांना या दुःखातून लवकरात लवकर सावरण्याचे बळ स्वामी समर्थांनी द्यावे या करीता श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केले असल्पाचे मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल वाडे, रवी मंगळूरे, प्रसन्न गवंडी, देविदास गवंडी, संतोष वगाले, सौरभ हळके, सिद्धाराम लालसेरी, शिवशरण इचगे, महेश माळी, अरुण शिंदे,
ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, आनंद देसाई, अभिषेक भकरे, धनराज पाटील, सिद्धाराम मंगळूरे, प्रसाद मंगळूर, सुदर्शन पाटील, राज मद्रिकर, अमर गडकरी, शुभम वडतीले, महेश करपे, चेतन शिंदे, सतीश धरणे, माशाळे, ओंकार देशमुख आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – जम्मू कश्मिर येथील पहगलाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करताना अक्कलकोटवासी दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button