*अक्कलकोट चे सामाजिक कार्यकर्ते,के.एल. ई. च्या मंगरुळे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक तथा शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांचा बसवतत्वश्री पुरस्काराने सन्मान.*
पुरस्कार

*अक्कलकोट चे सामाजिक कार्यकर्ते,के.एल. ई. च्या मंगरुळे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक तथा शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांचा बसवतत्वश्री पुरस्काराने सन्मान.*

बसव सेंटर या सोलापुरातील नामांकित संस्थेकडून अक्कलकोट चे सामाजिक कार्यकर्ते,के.एल. ई. च्या मंगरुळे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक तथा शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांना बसवतत्वश्री ही मानद पदवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
समारंभाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मी हायड्रॉलिक चे एम. डी. शरद ठाकरे तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून बसव सेंटर चे अध्यक्ष राजेंद्र मयनाळ,उपाध्यक्ष नीलकंठ कोनापुरे,कार्याध्यक्ष बाबासाहेब कुलकर्णी,सचिव प्रा.मल्लिनाथ पाटील ,कार्यवाह लीलावती मडकी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून बसव सेंटर च्या वतीने प्रतिवर्षी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समाजोपयोगी उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजन व मान्यवरांना मानद पदवी देऊन सत्कार करण्यात येतो.
या समारंभास मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम,गिरीश पट्टेद,काशिनाथ कापसे,चंद्रकांत जोकारे,विश्वनाथ पाटील,उमेश नेवाळे,जयंत उपासे,महांतेश मठपती,संजय चितली,सोमशेखर तारापूरे,महेश लाळशेरी,तर अण्णाप्पा कडादी प्रशालेचे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील,श्रीशैल खूने,विनायक वाडकर,संतोष पाटील, नागप्पा मैंदर्गी,सिद्राम तंबाके,राहुल भिंगे,मल्लिनाथ कोरे,विजय तुप्पे,मित्र परिवार
रवी जोशी,संतोष वगाले,संजय चांगभले, शांतप्पा कलबुर्गी,माधव कुलकर्णी,काशिनाथ मणुरे,राघव बागेवाडीकर,सुशील हिरस्कर,सायबान सोनकांबळे,राजू काकडे,गुंजे अण्णा,पांडुरंग केत आदी मित्र परिवार उपस्थित होता.
