गावगाथा

पुणे महानगरपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

जयंती विशेष

पुणे महानगरपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

पुणे : विश्वगुरू जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९३ वी जयंती पुणे महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच बसव सेवा प्रतिष्ठान, पुणेचे पदाधिकारी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी महात्मा बसवेश्वरांचा “कायकवे कैलास” हा विचार आजच्या समाजासाठीही अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी बसवेश्वरांच्या समता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा समाजाने अवलंब करावा, असेही आवाहन केले.

या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी, बसव सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “महात्मा बसवेश्वर महाराज की जय” या घोषणांनी महापालिका परिसर भक्तिमय झाला होता.

यावेळी बसव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button