महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बसवसृष्टी निर्माण करावे – विजयकुमार हत्तुरे
सोलापूर : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर व ड्रीम फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कायकवे कैलास’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बोलताना माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी विजापूर रोड मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या वतीने प्राचार्य मनोज बिडकर यांच्याकडे महात्मा बसवेश्वरांचे 5 एकर बसव सृष्टी निर्माण करावे ही मागणी केली. यामध्ये भव्य अश्वारूढ पुतळा, कायक शरणांची माहिती, विद्यार्थ्यांसाठी मोठे अद्यावत आधुनिक सभागृह उभारणी करावे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सुमारे 28 एकर जागा असून या संस्थेत 27 व्यवसाय प्रशिक्षण कोर्स चालतात.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,मंत्री मंगल प्रभात लोढा,पालकमंत्री जयकुमार गोरे व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे ईमेल द्वारे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी मागणी केली आहे.
या कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी, गटनिदेशक,
शिल्प निदेशक, कार्यालयीन कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ‘कायकवे कैलास’ या तत्वज्ञानाचा अर्थ “काम हीच पूजा” असा असून प्रामाणिक परिश्रमातूनच यश मिळते,हा संदेश व्याख्यानातून अधोरेखित करण्यात आला.
या कार्यक्रमात वक्ते म्हणून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री.दशरथ वडतीले (सदस्य, संस्था व्यवस्थापन समिती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून समाधान हॉस्पिटल, सोलापूर येथील डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी उपस्थित होते.
प्रमुख वक्त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची आजच्या औद्योगिक युगातील उपयुक्तता स्पष्ट करत प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य, स्वावलंबन व कार्यनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले. उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य, गुणवत्ता व सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य मनोज बिडकर, ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक विश्वनाथ आमणे , सिद्धेश्वर रिसॉर्टच्या संचालिका सौ. संगीता भतगुणकी ,सौ.प्रिती उडाणशिव,विवेक विचार मंचचे सिद्धांत बाबरे ,तसेच वरिष्ठ गटनिदेशक,निदेशक, कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण प्रा.मनोज बीडकर यांनी केले तर सूत्रसंचालन कांचन कुंभार यांनी केले. स्मिता शिंदे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस चे कार्यक्रमाधिकारी निर्मला म्हेत्रे ,सहाय्यक कार्यक्रमाधिकारी कु-हाडे नितीन यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांना महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली असून त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन लाभले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!