गौतमी चिपळूणकर यांच्या गायनरंगाने रंगला स्वामी दरबार
भक्ती संगीत सेवेने गौतमी चिपळूणकर यांनी धर्मसंकीर्तन महोत्सवातील गुंफले १२ वे पुष्प.

गौतमी चिपळूणकर यांच्या गायनरंगाने रंगला स्वामी दरबार

भक्ती संगीत सेवेने गौतमी चिपळूणकर यांनी धर्मसंकीर्तन महोत्सवातील गुंफले १२ वे पुष्प.


(श्रीशैल गवंडी, दि.२५/०४/२५, अ.कोट)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील १२ वे पुष्प कोल्हापूर येथील गायिका गौतमी चिपळूणकर यांनी आपल्या सदाबहार भावभक्ती गीतांनी गुंफून गायन रंगाने श्री वटवृक्ष स्वामींच्या दरबारात रंग भरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी गायिका गौतमी चिपळूणकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. या भक्ती संगीत सेवेत गायिका गौतमी चिपळूणकर यांनी जय शारदे, दत्ता हेचि दान द्यावे, स्वामी समर्थ महामंत्र हा माझे पूजन, मी पुन्हा वनांतरी, सुंदर ते ध्यान, असा हा एकच श्री हनुमान, धन्य मी शबरी, राम जन्मला, दत्त दत्त नामाचा महिमा, गुरु एक जगी त्राता, नाव स्वामींचे येता कौसल्येचा राम माळ पदक विठ्ठल, पांडुरंग कांती, रुणुझुणु रे भ्रमरा इत्यादी भाव भक्ती गीते गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. या भक्ती संगीत सेवेत गौतमी चिपळूणकर यांना
यांना तबल्यावर रविंद्र क्षीरसागर, हार्मोनियमवर प्रशांत देशपांडे, ऑर्गनवर ओंकार पाठक, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, श्रीमुख जगदाळे प्रा.नागनाथ जेऊरे, विजयकुमार कडगंची, मनोहर देगांवकर, मयुर स्वामी, अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सैदप्पा इंगळे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, आदीत्य गवंडी, प्रकाश कासेगांवकर, शिवपुत्र हळगोदे, ज्ञानेश्वर भोसले, विपूल जाधव, अविनाश क्षीरसागर, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, प्रा.शिवशरण अचलेर, दिपक जरिपटके, प्रसाद पाटील, श्रीशैल गवंडी, महेश मस्कले, मोहन जाधव, प्रसाद सोनार, मोहन शिंदे, बंडेराव घाटगे, नरसिंग क्षीरसागर, संजय बडवे, चंद्रकांत गवंडी, सुनिल कटारे, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, महेश मस्कले आदींसह मोठया संखेने स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तन श्रवण सेवेचा आनंद लुटला.

फोटो ओळ – श्री.वटवृक्ष मंदिरातल्या धर्मसंकीर्तन महोत्सव व्यासपीठावर भक्ती संगीत सेवा सादर करताना गायिका गौतमी चिपळूणकर व सहवादक दिसत आहेत.
