गावगाथा

मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांची निर्मिती असलेल्या ‘आरंभ’ या माहितीपटाने महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे पटकावली पारितोषिके..

बक्षिसे

  • मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांची निर्मिती असलेल्या ‘आरंभ’ या माहितीपटाने महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे पटकावली पारितोषिके…

    राज्य शासनाच्या उमेद अभियानावर तयार केलेल्या महिलांची यशोगाथा असलेल्या मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘आरंभ’ या माहितीपटाने संभाजीनगर येथील नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय REEL International Film Festival 2025 या फिल्म्स फेस्टिवलमध्ये ‘आरंभ’ या माहितीपटाला WOMEN EMPOWERMENT PROJECT AWARD म्हणून पुरस्कार मिळाला आहे…

    या फेस्टिव्हल मध्ये 60 पेक्षा जास्त देशातून एकूण 1200 हून अधिक फिल्मस् आलेल्या होत्या..त्यामध्ये ‘आरंभ’ हा माहितीपटाने विशेष विजेतेपद पटकविले आहे…

    तर दुसरीकडे डोंबिवली येथील SCREEN LIGHTS FILM FESTIVAL मध्ये देखील WOMEN EMPOWERMENT PROJECT AWARD म्हणून ‘आरंभ’ याच माहितीपटाला पुरस्कार मिळाला आहे…

    यावेळी आयोजकांकडून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र हे दोन्हीही प्राप्त झालेले आहे..

    उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी या गावातील महिलांच्या स्वयंसहायता समूहाने एकत्रित येऊन सुरू केलेल्या आठवडी बाजार आणि त्यातून मिळणारे उत्पन आणि आनंद यावर आधारित हे सर्व चित्रीकरण सचिन जगताप आणि त्यांच्या टीमने करुन आरंभ माहितीपटाची निर्मिती केली आहे.

    प्रतिकुल परिस्थितीत हतबल न होता आपल्या गावासाठी काही करता येईल असा विचार बेलाटी गावातील महिलांनी केला. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या महिलांनी बचतगटाच्या अर्थात ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ता. उत्तर सोलापूर यांच्या सहकार्याने केलेल्या कार्याची यशोगाथा या ‘आरंभ’ माहितीपटात दाखविण्यात आली आहे.

    यासाठी निर्मिती, संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन सचिन जगताप यांचे असून व्हिडीओ चित्रीकरण सोहेल इंगळगी तर लेखन श्रुती कुलकर्णी-पात्रुडकर आणि निवेदन आवाज रसिका भट-लिमये यांचा आहे.

-विशेष सहकार्य-
श्री.प्रमोद चिंचोरे आणि समस्त बेलाटी ग्रामस्थ परिवार
धन्यवाद आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे उत्तुंग यश संपादन करू शकलो..
धन्यवाद !
आपला एक छोटासा कलाकार-
सचिन अशोक जगताप
मोशन फिल्म स्टुडिओ,
सोलापूर
Mob-9822092303

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button