वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा बॉईज हायकूल मधील सुपरवाजकर फिलिप रॉड्रिग्ज हे तब्बल ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. ते उच्चशिक्षित असून या शाळेत १९९३ रोजी मराठीचे शिक्षक म्हणून रुजू झाले होते.शांत प्रेमळ आणि सर्वांशी मिसळून वागणारे असा त्यांचा नावलौकिक होता.पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची देखील त्यांना आवड आहे.विविध वर्तमान पात्रांत त्यांचे लेख कविता प्रसिद्ध होत असतात तसेच त्यांनी स्वतःस्थापन केलेल्या कुपारी संस्कृती मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामजिक काम सुरू आहे. सरांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कॉलेज जीवनातील मित्र, त्यांचा परिवार, मोठा भाऊ, पत्नी, मुलगा तसेच शाळेचे प्रिन्सिपॉल फादर निकी, व्यवस्थापक मॅनेजर फादर हेन्री, फादर शिनोय, उपमुख्याध्यापिका टीचर रोझ, सेवानिवृत प्रिन्सिपॉल फादर जेरोम डिसोझा, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, टीडीएफ शिक्षक संघटनेचे सुनील वडतकर तसेच शिक्षक भारतीचे चंद्रकांत म्हात्रे, बंडगर सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने तर सांगता सुग्रास भोजनाने झाली.सर अक्षय जाधव यांनी यांनी सूत्रसंचालन केलं.यावेळी मुख्य म्हणजे सुरुवात होताना धर्मगुरू फ्रान्सिस पोप आणि काश्मीर मध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाची आखणी दहावीच्या शिक्षिका लिंडा अँथनी, सीमा जोसेफ, उज्वला अल्मेडा, यांनी तर कार्यक्रम यशवी करण्यासाठी गणेश हिरवे, जया नायर, विशाल टिकूडवे यांनी मेहनत घेतली.