महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी रेखा सोनकवडे यांची निवड..
निवड नियुक्ती

महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी रेखा सोनकवडे यांची निवड..

सोलापूर — वागदरी तालुका अक्कलकोट येथील रेखा सोनकवडे यांची महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्ती पत्राद्वारे किसनराव पाटील राष्ट्रीय अध्यक्ष महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत यांनी कळविले आहे.
महिला वरील अन्याय,अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार या अशा अनेक महिलांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण करून महिलांना न्याय देण्याचे कार्य करण्याची संधी सोनकवडे यांना मिळणार आहे. यावेळी बोलताना रेखा सोनकवडे यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्न करणार आहे या पदाला योग्य न्याय देण्यासाठी काम करणार आहे.मोठी जबाबदारी आहे .
या निवडीने त्याचे मित्र परिवार सहकार्यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
