गावगाथा

सत्संग महिला भजनी मंडळाचे भजन-भारूड व दहीहंडी फोडून गोपाळकाला भक्तीभावाने साजरा

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाची गोपाळकाल्याने सांगता.

सत्संग महिला भजनी मंडळाचे भजन-भारूड व दहीहंडी फोडून गोपाळकाला भक्तीभावाने साजरा

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात
श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाची गोपाळकाल्याने सांगता.

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, दि.२७/०४/२०२५.अ.कोट) श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता आज सायंकाळी ७ वाजता गोपाळकाल्याने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भजन, अभंग, गवळण व भारूड सेवा सादर झाली. या कार्यक्रमात सुरेखा तेली, शकुंतला कटारे, स्वाती गंभीरे, मिनाक्षी शिंदे यांनी विविध अध्यात्मिक व धार्मिक भजन भारूड सादर केले. सायंकाळी ७ वाजता

HTML img Tag Simply Easy Learning    

उपजोनिया पुढती येऊ ! काला खाऊ दहीभात !! वैकुंठी तो ऐसे नाही ! कवळ काही काल्याचे !! एकमेका मुखी घालू ! सुखी देऊ हंबरी !! तुका म्हणे अवघे !
बरवे वाळवंट उत्तम !!

HTML img Tag Simply Easy Learning    

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने व देवस्थानचे देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधित्त्याखाली पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते पूजा करून
प्रथमेश इंगळे व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते दहीहंडी काला फोडून

HTML img Tag Simply Easy Learning    

गोपाळकाला गोड झाला ! गोविंदाने गोड केला !!

या नामघोषात गोपाळ काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाल्याची माहिती देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. या प्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंडोळे, शकुंतला कटारे, रामचंद्र समाणे, निंगूताई हिंडोळे,
ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव, महानंदा शिंदे, मंगला काळे, पार्वती पाटील, शिवमुर्ती तेली, कौशल्या जाजू, प्रा.शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, डॉ.जयंत शेळगीकर, श्रीपाद देव, श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, मोहन शिंदे, प्रसाद सोनार, मोहन जाधव, संजय पाठक, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, सचिन हन्नुरे, शिवाजी यादव, संतोष जमगे, शिवशरण इचगे, प्रसन्न हत्ते, अक्षय सरदेशमुख, विपूल जाधव, दर्शन घाटगे, प्रसाद किलजे, धनराज स्वामी, तुषार मोरे, शिवाजी गुजर आदींसह देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी व असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – गोपाळकाल्या प्रसंगी दही हंडी फोडताना मंदार महाराज पुजारी, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button