पूरग्रस्तांसाठी शिवस्पर्श संस्थेचा मदतीचा हात ;
सेवेचे ठायी तत्पर शिवस्पर्श
मराठवाडा आणि विदर्भातील अलीकडील पुरपरिस्थितीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून जाताना अनेक शेतकऱ्यांचे जीवन संकटात सापडले. अशा कठीण काळात शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढे येणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे, या जाणिवेतून पुण्यातील शिवस्पर्श संस्था पुढे सरसावली आहे.

शिवस्पर्श संस्थेचे सभासद सचिन खताळ व बाजीराव खताळ यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी गावातील पुरग्रस्तांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर मदतीचे आवाहन करण्यात आले आणि संस्थेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सामाजिक उपक्रमातून पासलेवाडी गावातील सुमारे ६० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. या कार्यात गावचे सरपंच मा. राहुल पासले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्या समन्वयामुळे हे कार्य सुरळीतपणे पूर्ण झाले.

या मदतकार्यामध्ये संदीप तेलतुंबडे, तुषार गायकवाड, दीपक कुटे, स्नेहल विरकुड, अमोल वरे, गजानन भोसले आणि जयेश सपकाळ यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सहभाग घेतला.
शिवस्पर्श संस्थेच्या वतीने या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, भविष्यातही अशा सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचा संस्थेचा मानस आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!