महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आई-बाप समजून घेताना त्यांनी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार जोपासावेत ; तहसीलदार विनायक मगर
महाविद्यालयातील विविध शाखेतील, क्षेत्रातील व क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आई-बाप समजून घेताना त्यांनी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार जोपासावेत ; तहसीलदार विनायक मगर

अक्कलकोट –अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयातील बारावी आणि पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार व वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, समन्वयक डॉ. गुरुलिंगप्पा धबाले उपस्थित होते.

तहसीलदार मगर पुढे म्हणाले, समाजामध्ये डॉक्टर इंजिनीयर शिक्षक विविध क्षेत्रातील क्लास वन अधिकारी तयार होत असतात. त्याचप्रमाणे समाजाची सेवा करण्यासाठी एखादा मेकॅनिक सुद्धा तयार झाला पाहिजे. त्याच्या कला कौशल्या वरून त्याचे स्वतःची ओळख निर्माण करता येते. त्याला समाजामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात चेअरमन खेडगी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वैयक्तिक जीवनामध्ये स्थान दिले पाहिजे. उत्तम पद्धतीचे खेळाडू निर्माण झाले पाहिजे. कोणतीही कला कौशल्य शिकायचे असेल तर ते मनापासून आणि आत्मविश्वासाने शिकले पाहिजे. आत्मविश्वास हाच आपल्या प्रगतीचा पाया आहे. आपल्या मते निर्माण केल्यास आपण कोणतीही यश खेचून आणू शकतो.

प्राचार्य डॉ. आडवीतोट यांनी अहवालाचे वाचन केले. शासनाचे बदलत जाणारे नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत कोणकोणते बदल झालेले आहेत. किमान कौशल्यांवर कसा भर दिला जात आहे. तसेच महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा संपन्न कशा रीतीने झालेल्या आहेत. कोणकोणते नव्याने कोर्स महाविद्यालयात चालू केलेले आहेत. त्याचा आढावा घेतला.

महाविद्यालयातील विविध शाखेतील, क्षेत्रातील
व क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
समन्वयक डॉ. धबाले यांनी प्रास्ताविक भाषण केले.
कार्यक्रमास प्राध्यापक, पालक वर्ग व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. संध्या इंगळे व प्रकाश सुरवसे यांनी केले. तर आभार हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विठ्ठल वाघमारे यांनी मानले.