गावगाथा

प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट हे बहुआयामी व्यक्तिमत्व — मेजर एम.शेख

व्यक्ति विशेष

प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट हे बहुआयामी व्यक्तिमत्व
— मेजर एम.शेख
प्राचार्य कॅप्टन डॉक्टर शिवराय अडवीतोट हे उच्च शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगन्य नाव असून त्यांनी आपल्या कार्ययाचा ठसा केवळ सोलापूर विद्यापीठ परिसरात नसून संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, नांदेड, बेंगलोर, आदी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आपल्या शैक्षणिक कार्यामुळे नावलौकिक प्राप्त केलेले एकमेव व्यक्ती असून ते बहुयामी व्यक्तिमत्व या बिरूदावलीस योग्य आहेत असे मत मेजर प्राचार्य एमए शेख यांनी अध्यक्षस्थानवरून आपले मत व्यक्त केले ते सीबी खेडगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराया आडवी तोट यांच्या सेवानिवृत्तीच्या पूर्वसधेला -महाविद्यालयातील भूगोल विभाग व एनसीसी विभागाच्या वतीने आयोजित शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी आपले मत व्यक्त केले ते पुढे असेही म्हणाले की भूगोल विषयातील त्यांचा योगदान आणि एनसीसी मधील त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात सेवा बजावत आहेत ते एक उत्तम अभ्यासक, प्रशासक व मनमिळाऊ व्यक्ती असल्याचा उल्लेख त्यांनी केले.
प्रारंभी वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भूगोल विभाग व एनसीसी युनिट तर्फे प्राचार्य आडवीतोटे यांचा गणेश मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य कदम, मंगरुळे कॉलेज,मुख्याध्यापक मणियार श्री गजा कोश प्रकाश, आणि चीफ ऑफिसर आत्माराम घाट गे,फारुख शेख हे उपस्थित होते या शुभेच्छा प्रसंगी श्री आत्माराम घाटगे,प्रकाश गजा कोश, मनियार एम, प्राचार्य कदम आणि विभागातील डॉ. सोमनाथ राऊत, एन एन सी अधिकारी वर्षाराणी हाताळी,महेश पाटील आदिल शेख, डॉ. लता हिंडोळे,डॉ. अंकुश शिंदे कॅप्टन डॉ. भैरप्पा कोणदे भूगोल व एन सी सी चे आजी-माजी छात्र सैनिक व विद्यार्थ्य आपले मनोगताद्वारे प्राचार्य अडवितोट सरांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करून त्यांना भावी आयुष्याचा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राऊत यांनी आपल्या सरांचे जीवनपट ppt च्या सह्याने सर्वसमोर दाखविले.
सत्काराला उत्तर देताना स्वतःचे जीवनदर्शन विद्यार्थ्यांना सांगितले त्यांचे जीवन प्रवास हा एक अभ्यास विषय होऊ शकतो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून प्राध्यापक ते प्राचार्य पदापर्यंतचा अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले त्यांनी याप्रसंगी प्रत्येकाचे जीवन हे संघर्षमय असते,-कधीही नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे यश अपयश हे येतात व जातात त्याप्रसंगी खूपच न जाता जीवन जगावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले त्यांनी एनसीसी व भूगोल विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केल्यामुळे आज अनेक विद्यार्थी शासकीय, अशासकीय,उद्योजक व राजकीय पुढारी अश्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविले आहेत. ते माझे विद्यार्थी आहेत हे सांगण्याचे भाग्य मला लाभले त्यामुळे मी आपला सर्वांना धन्यवाद न म्हणता शेवटपर्यंत आपल्या ऋणात राहीन व भविष्यात जर माझ्याकडून काही सेवा हवी असेल तर माझ्या घराचे दार आपल्या सर्वांसाठी सदैव खुली आहेत. संस्थेने दाखविलेल्या विश्वासामुळे मी 31 मे 2025 रोजी प्राचार्य पदावरून आनंदाने सेवानिवृत्त होत आहे. याप्रसंगी अनेक शाळा महाविद्यालने सत्कार केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुमारी विजयालक्ष्मी जेउरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कुमारी जाकापूर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दर्शना पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button