गावगाथा

*अक्कलकोट मध्ये उद्यापासून कलबुर्गी शरणबसप्पा पुराण*

धार्मिक कार्यक्रम

*अक्कलकोट मध्ये उद्यापासून कलबुर्गी शरणबसप्पा पुराण*
अक्कलकोट दि. १३- येथील आझाद गल्लीत श्री अक्कमहादेवी प्रतिष्ठापनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १४ ते २४ फेब्रुवारीपर्यंत श्री कलबुर्गी शरणबसप्पा चरित्रावरील पुराण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सांगता समारंभाच्या दिवशी सायंकाळी धर्मसभा, पुराण समाप्ती व हजारो भाविकांना खिरीचे महाप्रसाद वाटप होणार आहे.

विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीकणबस मठाचे मठाधिपती श्री. प्रभुप्रशांत महास्वामीजी यांच्या उपस्थितीत महादासोही कलबुर्गी शरणबसप्पा यांच्या जीवनचरित्रावर दहा दिवस उमराणी येथील श्री. मृगेंद्र शास्त्री यांच्या अमृतवाणीने आणि संगीत- विरपाक्षय्या गौडगाव, तबला- बसवराज आळंद यांच्या साथसंगतीने घाणदेवी मंदिर मैदानावर दररोज सायंकाळी ५ वाजता प्रवचन होणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुराण व प्रवचनचे उद्घाटन श्रीक्षेत्र बु-हाणपूर सिध्दयप्पा देवस्थानचे अध्यक्ष नागलिंगय्या स्वामी, ज्येष्ठ समाजसेवक मल्लिनाथ स्वामी, सिध्दाराम येरगुंटे, श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंगय्या स्वामी, प्रसिद्ध व्यापारी सुर्यकांत बिराजदार, समाजसेविका मल्लम्मा पसारे व वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा तेली यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या पुराण व प्रवचनात रविवारी ( दि. १६) सायंकाळी सात वाजता पाळणा कार्यक्रम होईल. तसेच शुक्रवारी (दि.२१ ) सायंकाळी सात वाजता भारती संजय समाने यांच्या वतीने सुहासिनींचा ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे.
या प्रवचन सोहळ्यात दररोज रात्री आठ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे.

सोमवारी ( दि. २४) पहाटे पाच वाजता श्री ची महाअभिषेक व पूजा, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्रीक्षेत्र हिरेजेवरगी संस्थान श्री शांतलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधिपती श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची धर्मसभा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे व माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी श्री अक्कमहादेवी मंदिर समाजसेवा संस्था चे अध्यक्ष श्रीशैल भरमशेट्टी, उपाध्यक्ष शिवशंकर चनशेट्टी व सचिव लक्ष्मण समाने आणि सर्व पदाधिकारी आदींचे सहकार्य लाभत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अक्कमहादेवी मंदिर समाजसेवा संस्था, आझाद गल्ली यांच्या वतीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button