अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे ” वार्षिक क्रीडा सप्ताहास ” मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ—-
वार्षिक क्रीडा स्पर्धा

अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे
” वार्षिक क्रीडा सप्ताहास ” मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ—-
—————————————-
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व खास करून त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला घडवण्यासाठी मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्त्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना क्रीडास्पर्धेतून मिळते. म्हणूनच महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे प्रतिवर्षी ” वार्षिक आतंरवर्गीय क्रीडा स्पर्धांचे”आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून याही वर्षी आजरोजी अत्यंत शिस्तबद्ध व चांगल्या पद्धतीने या ” वार्षिक क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ करण्यात आले. सुरुवातीस उपस्थित सर्व व्यवस्थापकीय मंडळाचे प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग सहाय्यिका सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांनी शब्दसुमनांनी स्वागत करुन “क्रीडा महोत्सव” आयोजित करण्यामागचा उद्देश प्रास्ताविकातून विषद केल्या. यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. शिवप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यानंतर प्रशालेची विद्यार्थिनी कु. करुणा हेगडे हिने उपस्थित मान्यवरांना मानवंदना देऊन क्रीडा स्पर्धा सुरू करण्याची परवानगी मागितली व मान्यवरांच्या हस्ते ” क्रीडा ज्योत ” पेटवून उदघाटन कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या खेळाडूंनी क्रीडा संचलनाद्वारे मानवंदना देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खेळाडूंनी ” क्रीडा शपथ” घेऊन अत्यंत संयमाने, जिद्दीने व खिलाडूवृत्तीने खेळण्याची हमी दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे, पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान केल्यानंतर संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी ” खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून जीवनाच्या सर्वच क्षेत्रात खेळाचे खुप महत्त्व आहे. शिवाय खेळ माणसाचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत करते. याकरिता विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून च विशिष्ट अशा प्रकारच्या खेळात पारंगत झाले पाहिजे असे आवाहन आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना केले. तर ” आजची मुले लहान-लहान गोष्टीने तणावग्रस्त होतात. पालकांच्या मुलांविषयी च्या अति प्रेमापोटी, मुलांना पुरवत असलेल्या सर्व हट्टामुळे आजच्या मुलांना फक्त जिंकणे माहित आहे. हरण्यातून सावरण्याची शक्ती आजच्या मुलांमध्ये दिसून येत नाही मात्र खेळांमुळे तणावमुक्त होण्याची किमया साधण्याबरोबरच हार सुद्धा अत्यंत संयमाने पचवता येते तेंव्हा विद्यार्थ्यांनी खेळांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. असे प्रतिपादन संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. यानंतर संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते मैदानावर श्रीफल वाढवून व संस्थेच्या सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा यांच्या हस्ते नाणेफेक करून ” खोखो सामन्यांना सुरूवात करण्यात आले. हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते श्री.सागरदादा कल्याणशेट्टी यांनी भेट देऊन या प्रशालेत संपन्न होत असलेल्या ” वार्षिक क्रीडा महोत्सवास” शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रीडा विभाग प्रमुख श्री.शहाजी माने, सहायक श्री. सरदार मत्तेखाने, श्री. स्वामीनाथ कोरे, प्रा. रविंद्र कालीबत्ते, काशीनाथ पाटील, रमेश शिंदे, सहशिक्षक धनंजय जोजन, सुरेश जाधव, राजेंद्र यंदे,शशी अंकलगी, अब्दुलअझीझ मुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी केले. तर आभार सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी मानले.
