कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते.

कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते.

सोलापूर : रामलला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत असताना सोलापुरात एक लाख लोकांचा नवीन गृहप्रवेश होत आहे. २२ जानेवारीला आपण नवीन घरात गेल्यानंतर रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीत केली.

पंढरपूरचा श्री विठ्ठल अन् सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराजांना नमस्कार केला. २२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार असे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने ‘जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. मोदी म्हणाले, आपण २२ जानेवारीला रामज्योती प्रज्ज्वलित केल्या तर गरीबी नष्ट करण्याची प्रेरणा मिळेल.
