कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात “क्रिडा सप्ताहाचे” महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
क्रिडा सप्ताहाचे आयोजन

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात “क्रिडा सप्ताहाचे” महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन


(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१९/१/२४)
सालाबादप्रमाणे यंदाच्या सन २०२३-२४ शैक्षणिक सालातील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात “क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबरच शारिरिक व खिलाडु वृत्तीचा विकास व्हावा असा महाविद्यालयाचा मानस आहे. या क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.महेश (मालक) इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. मा.चेअरमन साहेबांनी क्रिकेट, खो-खो, हाॅली बाॅल , बॅडमिंटन इत्यादी क्रिडा प्रकारांचे उद्घाटन केले व सर्व खेळाडुना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी.जेऊरे सर ,उपप्राचार्य व्हि.डि. पवार सर, महाविद्यालयाचे एसीओ ए.ए.भावठाणकर सर व सर्व विभागांचे माननीय

विभागप्रमुख हे उपस्थित होते.
एक विशेष उपक्रम म्हणुन फन फेअरच्या अनुषंगाने विविध फुड स्टाॅलही ठेवण्यात आले आहेत. त्याचेही उद्घाटन मा.चेअरमन साहेबांच्या हस्ते झाले. मा.चेअरमन साहेबांनी व सर्व मान्यवरांनी या विविध फुड स्टाॅल्सचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी बोलताना मा.चेअरमन साहेब म्हणाले कि, विद्यार्थी हा अष्टपैलु व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या सर्व बाबी अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मा.चेअरमन साहेबांनी केले.

हा क्रिडा सप्ताह तीन दिवस चालणार असुन यांत क्रिकेट,खो -खो, व्हॉलीबॉल, कब्बड्डी, बॅडमिंटन, कॅरम, टगऑफ वार असे इत्यादींचे मॅचेस चालणार असुन शनिवार सर्व क्रिडांचे अंतिम सामने होणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. एन.बी. जेऊरे सरांनी दिली.
