
कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..

अक्कलकोट: फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत सौ.सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयाचा 84.54 % इतका लागला आहे. त्यात विज्ञान शाखेत एकूण 90 पैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 96.66 % निकाल लागल असून त्यात प्रथम कु.मनिषा सीताराम कदम 69.17 %, द्वितीय कु श्रेया अभिजीत मोरे 67.83 % तर तृतीय कु राजनंदिनी सिध्देश्वर स्वामी 67.50 % घेऊन बाजी मारले आहेत.

कला शाखेत एकूण 46 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 63.04 % निकाल लागला आहे. त्यात प्रथम कु शुभांगी विजयकुमार कोरे 87.83 %, कु वैभवी शिवाजी धर्मसाले 82.33% तर तृतीय कु संजीवनी महेश सुतार 75% गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

तर वाणिज्य शाखेत एकूण 71 पैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 83.09 % निकाल लागला असून प्रथम कु भूमिका प्रशांत पाटील 79.33% द्वितीय शरणप्पा लक्ष्मण वाले 77.67% तर तृतीय सुजाता अप्पाराव पाटील 73.33 % गुण मिळवून यश संपादन करून याहीवर्षी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यानी कौतुक करून अभिनंदन केले आहे.
निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मल्लिकार्जुन मसुती, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, संचालक मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी हे उपस्थित होते.
सूत्रसंचलन प्रा गुरूसिध्द हपाळे यानी केले तर उपस्थितांचे प्रा. शितल टिंगरे यानी आभार मानले.
