स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलोय – डीसीपी राहुल माकनीकर
डीसीपी राहुल माकनीकर यांचा सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलोय – डीसीपी राहुल माकनीकर

(प्रतिनिधी अक्कलकोट) –
जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि हरि दर्शनाची अनुभूती प्राप्त होते असे साक्षात्कारिक स्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे पावन स्थान तथा येथील वटवृक्ष मंदिर होय. केवळ भाग्यवंतांनाच स्वामी दर्शनाचा लाभ मिळतो याची प्रचिती स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेल्या भाग्यवान स्वामी भक्तांना येते याची आपणाला माहिती मिळाली आहे. या अनुशंगाने स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलो असल्याचे
प्रतिपादन नागपूरचे डीसीपी राहुल माकनीकर यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी
डीसीपी राहुल माकनीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी भाविकांच्या स्वामी दर्शन अनुभूती बद्दल बोलताना
डीसीपी राहुल माकनीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घागे, विश्वस्त महेश गोगी, योगेश धर्मा अधिकारी, विलास कलकर्णी,
संजय पवार, गिरीश पवर, विपल जाधव, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, संजय पाटील, देवस्थानचे सेवेकरी उपस्थित होते.

फोटो ओळ – डीसीपी राहुल माकनीकर यांचा सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
