श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची सेवा उल्लेखनीय बाब – गृहराज्यमंत्री योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची सेवा उल्लेखनीय बाब – गृहराज्यमंत्री योगेश कदम

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि – ७/०५/२५)
श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरविण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत. ते प्रत्यक्ष वटवृक्षाखाली तासंतास उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत व सुलभ स्वामींचे दर्शन कसे मिळेल याचे अत्यंत तळमळीने नियोजन करित असतात महेश इंगळे यांच्या या
व्यक्तीमत्त्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी
गृहराज्यमंत्री योगेश कदम बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, जिल्हा प्रमुख शिवसेना मनिष काळजे, तालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट संजय देशमुख, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – गृहराज्यमंत्री योगेश कदम
यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
