समर्थांची कृपासावली हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य – अभिनेत्री मानसी नाईक
स्वामी दर्शनानंतर अभिनेत्री मानसी नाईक यांचे मनोगत.

समर्थांची कृपासावली हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य – अभिनेत्री मानसी नाईक

स्वामी दर्शनानंतर अभिनेत्री मानसी नाईक यांचे मनोगत.

(श्रीशैल गवंडी,अ.कोट, दि.१८/०५/२०२५)
ब्रम्हांडनायक दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांची कृपासावली हेच आमच्या कुटुंबीयांच्या जीवनाचे सर्वात मोठे भाग्य असल्याचे मनोगत हिंदी व मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेत्री मानसी नाईक यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी अभिनेत्री मानसी नाईक बोलत होत्या. पुढे बोलताना मानसी नाईक यांनी मी काम केलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांना व मालिकांना व माझ्या भूमिकेला माझ्या बांधव भगिनीनी भरघोस प्रतिसाद देत असल्याचे पाहून मन गहिवरले आहे. ज्यामुळे दर्शनप्रित्यर्थ आज येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले असल्याचे सांगून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरकृत महेश इंगळे यांच्या स्वामी भक्ती प्रचार-प्रसार कार्य वाढीस प्रोत्सहान देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, प्रविण देशमुख, विश्वस्त महेश गोगी, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद पाटील, शिवशरण अचलेर व अन्य उपस्थित होते.

फोटो ओळ – अभिनेत्री मानसी नाईक यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
