माजी विद्यार्थ्यांनी केला गुरुवर्य श्री नवले गुरुजी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न
जि. प. शाळा दहिटणे च्या सन 1998 -99 बॅचच्या माझी विद्यार्थ्यांकडून त्यांचे *गुरुवर्य श्री पुंडलिक नवले गुरुजी* यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अरुण पोपसभट गुरुजी, शकुंतला जोजन मॅडम, महादेव मैत्री गुरुजी, केंद्रप्रमुख श्री धडके साहेब ,कोकणे मॅडम, वजीर शेख गुरुजी, विजय जोजन गुरुजी व तसेच गावचे तंटामुक्त आध्यक्ष तहिर शेख उपस्थित होते या सर्व गुरुवर्यांचा देखील विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा देखील आनंदात साजरा करण्यात आला .गुरुजन वर्गाने आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षकांचा सत्कार करणे हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम असेल असे म्हणाले .खूप सुंदर व सुरेख कार्यक्रमाचे नियोजन व सत्कार बद्दल गुरुजींनी या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मनापासून खूप कौतुक केले व मनापासून खूप आभार मानले यावेळी या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाबद्दल मनोगत
व्यक्त केले
या कार्यक्रमाचे आयोजन जि प शाळा इयत्ता चौथी सन 1998- 99 च्या विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी या बॅचचे विशाल पाटील, सतीश स्वामी, सागर शिदे, अविनाश पाटील, हरून नदाफ, राम शिंदे, सुनंदा हुल्ले, वैशाली गोरे, वंदना गुजोटी, विजया बझले, कल्पना गाडेकर, अबिक घोडके, सुमीता हिरेमठ, यास्मीन शेख,कविता चौधरी. हे उपस्थितीत होते. आणि या कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनानी झाली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!