*तीर्थ येथे रामनवमी निमित्त* *व्याख्यान मालेचे आयोजन*
तरी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले आहे.

*तीर्थ येथे रामनवमी निमित्त*
*व्याख्यान मालेचे आयोजन*
————————————————————
श्री क्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)सामाजिक प्रबोधनाच्या निमित्ताने श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रामनवमी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी अँड.विक्रांत फताटे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली व श्री रामलिंगेश्वर देवस्थानचे पुजारी डॉ. सुभाष गुरव ,केदार पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
३१मार्च २०२५ रोजी कु.रसिका व कु.सानिका गीत रामायण गायनाच्या माध्यमातून सादर करणार आहेत.१एप्रिल २०२५ रोजी श्री शिवलिंगप्पा वंगे हे शेतक-यांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.२एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प.संजय पाटील महाराज हे जीवनात आध्यात्माचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
३एप्रिल २०२५ रोजी श्रीमती श्रद्धाताई कंडुडे या तरुणांना उद्योजक होण्याच्या संधी या विषयावर चर्चा करणार आहेत.
४ एप्रिल २०२५ रोजी प्रा.हनुमंत मते व भालचंद्र हंचाटे हे जीवनातील नाट्य या सबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
५ एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प.काशिनाथ गुरव महाराज हे मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांचे जीवन चरित्र सांगणार आहेत.वरील व्याख्याने श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता होणार आहेत.
६ एप्रिल२०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्री रामलिंगेश्वर पालखी मिरवणूक होऊन १० वाजता व्याख्यानमालेचा समारोप मा. ष.ब्र.गुरुशांतलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामी कल्लहिप्परगी,श्री. म.नि.प्र.बसवलिंगेश्वर महस्वमी विरक्त मठ अक्कलकोट, रमेश पाटील निव्रुत पोलीस अधिकारी, प्रशांत मुद्देबिहाळ,श्रीमती कल्पना पाटील, सौ.रेणुका पाटील-रणसिंग उपस्थित राहणार आहेत. तरी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले आहे.
