गावगाथा

कै.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चुंगीतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप.

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना प्रथमेश इंगळे, प्रशालेचे सदस्य राजीव माने, मुख्याध्यापक के.एस. गायकवाड, व अन्य मान्यवर दिसत आहेत.

कै.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चुंगीतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप.
(अ.कोट, श्रीशैल गवंडी) दि.१०/०९/२६ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज स्विमींग ग्रुपचे सदस्य बाळासाहेब एकबोटे यांच्या वतीने चुंगी येथील प्रशालेत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते शालेय वह्या वाटप करण्यात आले.
फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद साखरे, सदस्य मा.राजीव माने, प्रकाश आप्पाराव पडवळकर, महादेव चैन्नमोने, मुख्याध्यापक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते तालुक्यातील चुंगी येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशालेत हा उपक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक किरण गायकवाड म्हणाले कि महेश इंगळे व इंगळे कुटुंबीय परिवार हे पूर्वीपासूनच सामाजिक उपक्रमात नेहमीच भाग घेत असतात. समाजाच्या तळागाळातील नागरिक, विद्यार्थी, अबालवृद्धांना सहकार्य करून नेहमीच मदतीचा हात देत असतात. या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या जीवनाशी त्यांची आपुलकीची बांधिलकी असलेली जाणीव होत असते ‘विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत उक्तीप्रमाणे विनयशीलता, नम्रपणा हे गुण नगरसेवक
महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी व आमच्या ताई कै.रुपालीताई यांना देखील मी अगदी लहानपणापासून ओळखत असून ते माझ्या नेहमीच संपर्कात होत्या. त्यांचाही नम्र स्वभाव हा प्रत्येकाला आदरयुक्त व आधार युक्त वाटायचा. नम्रताच विद्यार्थ्यांना शिक्षणात यश संपादन करण्यास प्रेरित करीत असते म्हणून आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान महेश इंगळे व कै.रूपालीताई इंगळे यांच्या नम्रपणाची व या नम्रपणामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे व या कामी त्यांची स्मृती नेहमीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात राहावी याकरिता विद्यार्थ्यांना कै. रूपालीताईंची प्रतिमा असलेले वह्यांचे आज येथे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कामात आमचे परममित्र बाळासाहेब एकबोटे यांचे मोलाचे योगदान असल्याचेही मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश मालक इंगळे मित्र परिवारातील बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील पवार, मनोज इंगुले, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, तन्मय इचगे, तुषार मोरे, चुंगी प्रशालेतील
आर.एम.शिंदे, पी.आर.एकंबरे,
एस.एस.निंबाळकर, एस.डी.कारे, व्ही.पी.पडवळकर, एस.के.राठोड, व्ही.एस.महाडकुर, एस.आर.गायकवाड, सी.आर.हबळ्या, एन.एस.स्वामी, एस.एन.इळमनी, एस.यू.काजळे, एन.आर.शेख, डॉ.व्ही.एस.स्वामी आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ – विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना प्रथमेश इंगळे, प्रशालेचे सदस्य राजीव माने, मुख्याध्यापक के.एस. गायकवाड, व अन्य मान्यवर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button