गावगाथा

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे – मा.राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे

चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांचा सत्कार.

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे – मा.राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे

माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांचा सत्कार.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१०/०९/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव असल्याचे मनोगत राज्याचे माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांनी व्यक्त केले. आज सामाजिक न्याय खात्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा.दिलीप भाऊ कांबळे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि श्रींची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे बोलत होते. पुढे बोलताना राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे म्हणाले की श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे. दर वेळी अक्कलकोटला आलो की मनाला नवी ऊर्जा मिळते. आज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी जो जिव्हाळ्याने सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीने मंदिराचा जो कायापालट केला आहे, भाविकांसाठी भक्त निवास, भोजन व्यवस्था आणि स्वच्छता याबाबत केलेले नियोजन हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सामाजिक न्यायाचे काम करत असताना स्वामींचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. स्वामींची कृपा सर्वांवर अशीच राहो असे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टी, पुणे शहर उपाध्यक्ष सतीश गायकवाड यांचाही सन्मान मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – मा.राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे व अन्य मान्यवरांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button