गावगाथा

Akkalkot : अक्कलकोट शाखेच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; नगरसेवक महेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती

HTML img Tag Simply Easy Learning    

 अक्कलकोट (प्रतिनिधी ): गेल्या ७७ वर्षांपासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करून शेतीला बळ देण्याचे काम बँकेने केले आहे. बँकेची ७७ वर्षांची ही वाटचाल म्हणजे विश्वासाची वाटचाल आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून ते व्यापारी उद्योजका पर्यंत या बँकेने सर्वांना आधार दिला आहे असे प्रतिपादन येथील 

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. 

HTML img Tag Simply Easy Learning    

       नुकतेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शाखा अक्कलकोटचा ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त बँक परिसरात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी उपस्थित राहून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

        पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे म्हणाले, की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याच्या आर्थिक कण्याचा भाग आहे. अक्कलकोट शाखेचा कारभार अतिशय पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख आहे. मॅनेजर दीपक हजारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. बँकेची अशीच प्रगती होत राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थांच्या चरणी असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक महेश इंगळे यांनी बँकेचे मॅनेजर दीपक हजारे, सीनियर बँक इन्स्पेक्टर कोरपे , हवदे , यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी देविदास चव्हाण, मन्सूर अली मुल्ला, विनायक पुजारी, रमेश शिंदे यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी वृंद, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button