गावगाथा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते पूजा

गणेश उत्सव विशेष

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते पूजा
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते श्रींची पूजा विधिवत संपन्न झाली.
यावेळी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते तहसीलदार विनायक मगर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे सचिव शामराव मोरे काका उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरातील शमीवृक्षाखाली सुमारे ३३ वर्षांपूर्वी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर येथे सुंदर मंदिर व सभामंडप उभारण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर शमीवृक्षाच्या सान्निध्यात विराजमान असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेशाचे स्थान व महात्म्य अलौकिक मानले जाते.
यावेळी रामचंद्रराव घाटगे, रोहित खोबरे, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, प्रा. शरणप्पा अचलेर, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, धानप्पा उमदी, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, सनी सोनटक्के, गोटू माने, प्रवीण देशमुख, अतिश पवार, विलास देशमुख, रोहन शिर्के, बाबुशा महिंद्रकर, अनिल गवळी, प्रविण घाटगे, अप्पा हंचाटे, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, गणेश पाटील, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, एस. के. स्वामी, विलासराव रेड्डी, शुभम सावंत, स्वामिनाथ मलवे, ज्ञानेश्वर भोसले, दत्ता मोरे, सुमित घाटगे, ओंकार देशमुख, मुन्ना कोल्हे, भारत पाटील, किरण साठे, अमर मसरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : बुधवार १६ सप्टेंबर रोजी श्रींची पूजा
बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, अक्कलकोट यांच्या हस्ते श्री शमी विघ्नेश गणेशाची पूजा आयोजित करण्यात आली आहे.
चौकट : महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण
रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांचे सामुदायिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button