अन्नछत्र न्यास हे धार्मिक क्षेत्रातील कल्याणकारी कारभाराचा आदर्श — आमदार सुनील शेळके
अक्कलकोट:- प्रतिनिधी*
*अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली अन्नछत्र न्यास हे धार्मिक क्षेत्रातील कल्याणकारी कारभाराचा आदर्श असल्याचे मनोगत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.*
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
त्यांच्या समवेत आलेले अनंता मोहटकर, संदीप पिंपळे, श्रीकांत मुळे, मंगेश दहाडकर यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अनंत क्षीरसागर, योगेश कटारे, आकाश शिंदे न्यासाचे बाळासाहेब पोळ, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, कुमार सलबत्ते, शहाजी यादव, नामा भोसले, पिंटू हळ्ळूरे, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, रोहित कदम, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!