गावगाथा
मा.प्रकाश मंगाणे यांच्या कार्यालयात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सदिच्छा भेट; शेती विषयक योजनांवर सखोल चर्चा
यावेळी डॉ. शांतनु जगदाळे यांच्या समवेत त्यांनी Samarth Crop Care चे संस्थापक डॉ. प्रशांत अनिल गवळी, सुदाम दाश यांच्याशी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला.

मा.प्रकाश मंगाणे यांच्या कार्यालयात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सदिच्छा भेट; शेती विषयक योजनांवर सखोल चर्चा…

पुणे, दि. २ जून – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वयंरोजगार सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रकाश मंगाणे यांच्या पुण्यातील कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान राज्यातील शेतीविषयक सध्याची स्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांची अंमलबजावणी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी माननीय कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितले की, “राज्यातील शेती व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. पर्जन्यमानातील अस्थिरता, खतांची कमतरता, आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नव्या धोरणांची आखणी आवश्यक आहे.”
प्रकाश मंगाणे यांनी आपल्या अनुभवातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. विशेषतः सिंचन योजनांची अंमलबजावणी, कृषी उत्पादन बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीतील सुधारणा, तसेच शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारा आधार याबाबत त्यांनी आपली मते मांडली.
भेटीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली:
प्रधानमंत्री पीक विमा योजना व त्यातील सुधारणा
नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन
युवा उद्योजकांसाठी कृषी आधारित स्टार्टअप योजनांचा विस्तार
शेतमाल साठवणूक व प्रक्रिया उद्योगाला चालना
या भेटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन अधिक गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केली. या संवादामुळे आगामी काळात कृषी धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.
यावेळी कृषी मंत्रीनी प्रकाश मंगाणे यांच्या कार्याची कौतुक केलं सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे येण्यासाठी निमंत्रण दिले आहे
