आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल, जोगेश्वरीच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत नेत्रदिपक यश
गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी
श्रीलंका (कोलोंबो) येथे नुकत्याच झालेल्या ९ व्या एशिया गोजु रयु कराटे चॅंम्पियनशिप स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल, जोगेश्वरीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. टीम कुमिटे – या स्पर्धेत अक्षर पालव व अर्णव शेळके यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे. तसेच टीम काटा या स्पर्धेतही या दोघांनी रौप्य पदक मिळविले आहे.
टीम काटा स्पर्धेत अक्षर पालव,अर्णव शेळके व मोक्षदा शेळके यांना ब्रांझ पदक प्राप्त झाले आहे. विद्यार्थी व प्रशिक्षक भीमराव पवार आणि धीरज पवार या सर्वांनी श्रीलंकेत जाऊन यश संपादन केल्या बद्दल र.जि.म.ज्ञा.स.संस्थेचे कार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल चे चेअरमन सहदेव सावंत, संस्थेचे उपकार्याध्यक्ष अशोक परब,संस्थेचे सरचिटणीस जितेंद्र पवार, शाळेचे सी.ई.ओ. दीपक खानविलकर, कार्यकारणी सदस्या इंद्रायणी सावंत, मुख्याध्यापिका डींपल दुसाने, आणि शबनम मॅडम यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. जोगेश्वरीतिल विविध संस्था, व नागरीकांकडून आरजेएमडीएस इंग्लीश स्कुलच्या विदयार्थ्यांचे, पालकांचे, प्रशिक्षकांचे सर्व थरातुन अभिनंदन केले जात आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!