गावगाथा

वटवृक्ष मंदीरात पंकजा मुंडे यांनी केले प्लास्टीक वापर बंदीचे आवाहन

वटवृक्ष मंदीरात मंदीर परिसरातील व्यवसायिकांना प्लास्टीक बंदी वापर संदर्भात मार्गदर्शनपर आवाहन करताना ना.पंकजा मुंडे, महेश इंगळे, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

वटवृक्ष मंदीरात पंकजा मुंडे यांनी केले प्लास्टीक वापर बंदीचे आवाहन

(अ.कोट. )
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच गंभीर व दुर्धर आजारांच्या संक्रमणापासून मानव जातीचे संरक्षण होण्यासंदर्भात प्लास्टीक वापरावर बंदी आणण्याचे आवाहन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आज पंकजा मुंडे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे
यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी व मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की प्लास्टीक बंदी हा विषय अजेंड्यावर घेऊन संदर्भीय अमलबजावणी ही राज्यातील देवस्थान परिसरांपासून करण्याचे ठरवून त्याची सुरुवात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसरापासून करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते पर्यावरणपुरक अगरबत्तीचे शुभारंभही करण्यात आले. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी शासनाचा आरोग्य विषयक दृष्टीकोन डोळयांसमोर ठेवून देवस्थानच्या वतीने नेहमीच स्वच्छतेबाबत जनजागृती, मंदीरातील निर्माल्याचा योग्य वापर व्हावा हा ध्येय उराशी बाळगून मंदीरात स्वामींच्या चरणी अर्पण होणारे हार, फुले इत्यादी निर्माल्याच्या माध्यमातून पर्यावरण पुरक असलेली ही अगरबत्ती बनविण्याकामी सकारात्मकता ठेवून हे कार्य अमलात आणले आहे. या महान कार्याचे आज ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचा दुर्मिळ योग आला असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी याप्रसंगी तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, मा.नगरसेवक महेश हिंडोळे, नागराज कुंभार, मल्लीनाथ स्वामी, शिवशंकर चनशेट्टी, नन्नू कोरबू, अंकूश चव्हाण, कांतू धनशेट्टी, लखन झंपले, धर्मण्णा पाटील, अप्पी साळूंखे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, समर्थ स्वामी, तुषार मोरे आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – वटवृक्ष मंदीरात मंदीर परिसरातील व्यवसायिकांना प्लास्टीक बंदी वापर संदर्भात मार्गदर्शनपर आवाहन करताना ना.पंकजा मुंडे, महेश इंगळे, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button