गावगाथा

सोलापूर होणार गणवेशाचे जागतिक केंद्र सोलापूरला बनविण्याचे प्रयत्न

सोलापूर हे गणवेषनिर्मितीचे मोठे केंद्र व्हावे, या दृष्टीने तेथील उत्पादक, व्यापारी संघटनांची निश्चित वाटचाल सुरू

सोलापूर होणार गणवेशाचे जागतिक केंद्र सोलापूरला बनविण्याचे प्रयत्न

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर हे गणवेषनिर्मितीचे मोठे केंद्र व्हावे, या दृष्टीने तेथील उत्पादक, व्यापारी संघटनांची निश्चित वाटचाल सुरू आहे. सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व अन्य संघटनांतर्फे युनिफॉर्म ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स फेअर या व्यासपीठातर्फे देशव्यापी प्रदर्शन भरवल्याने शिवणकाम व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पूर्वी गावोगावी फिरून उधारीवर गणवेष विकणारे व्यावसायिक आता आपल्या दारात येणाऱ्या खरेदीदारांकडून अॅडव्हान्स मागून उत्पादन करत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापुरात कुशल कारागिरांकडे शिवणकामाचे प्रचंड कौशल्य आहे. कारखाने, कामगारांबरोबरच कापूस, कापड हा कच्चा मालही मुबलक आहे. त्यामुळे हव्या त्या प्रकारचे हवे तितके गणवेष आम्ही वेळात शिवून देऊ, हा विश्वास अशा प्रदर्शनांद्वारे देशभरातील खरेदीदारांना देण्यात आला. त्यामुळे जगातील खरेदीदार व उत्पादकही सोलापूरमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. सोलापुरात २०१७ व त्यापुढील वर्षी प्रदर्शने भरवल्यावर २०१९ मध्ये बेंगळूरु व मुंबईत प्रदर्शने झाली. दोन वर्षे कोरोनामुळे मंदीत गेल्यावर यंदाच्या हैदराबादच्या प्रदर्शनात साडेपाच हजार व्यावसायिकांनी सोलापूरच्या गणवेश उत्पादन हबची क्षमता पाहिली. दरम्यानच्या काळात मफतलाल, वालजी, क्यूमॅक्स, स्पर्क्स हे मोठे ब्रँडही तेथे आले. या सर्वांचा परिणाम म्हणून आता सोलापूरच्या व्यवसायात वाढ झाली आहे. पूर्वी केवळ शालेय गणवेषांपुरता सीझनल असलेला व्यवसाय आता बारमाही स्वरूपात रुग्णालये, खासगी कंपन्या, सुरक्षा रक्षक, कामगार, सरकारी आस्थापना, हॉटेल आदींच्या गणवेषांपर्यंत विस्तारल्याची माहिती यंदाच्या प्रदर्शनाचे अध्यक्ष अमित जैन यांनी दिली.———-
सोलापुरातील वैशिष्ट्ये३५० लहान-मोठे उत्पादक, हजारभर घरगुती शिलाई मशीन, सातआठ कोटींची निर्यात, पंधरा हजार कामगारांना रोजगार, पाच वर्षांत तितक्याच कामगारांची गरज, भिवंडीतील कापड हा कच्चा माल.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button