अक्कलकोट :
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने शनिवार 14 जून रोजी सकाळी 11 वा. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, याचबरोबर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, वसुंदरे ची जपणूक यासारखे कार्यक्रम हाती घेऊन अक्कलकोट सोलापूर रोड वरील दूतर्फा सुमारे 200 हुन अधिक वृक्षांची लागवड करून त्याचे वर्षभर संवर्धन करीत आहेत.
शनिवार 14 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता राजे फत्तेसिंह क्रीडांगण येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते तर अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तर
माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने या आधी मान्यवरांच्या उपस्थितीत बरोबरच, मॉर्निंग ग्रुप, सुप्रभात ग्रुप सर्व पदाधिकारी व सदस्य, अमोल राजे भोसले मित्र मंडळ व लेझीम संघ, रोहित खोबरे, सौरभ मोरे यांच्यासह आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दरम्यान शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे यांनी फत्तेसिंह क्रीडांगण येथे पाहणी केली. यावेळी न्यासाचे अरविंद शिंदे, सौरभ मोरे, श्रीकांत झिपरे, गोरख माळी यांच्यासह आदीजन उपस्थित होते.
चौकट :
निसर्ग व पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. श्री राजे फत्तेसिंह क्रीडांगण परिसरात विविध सुगंधित फुलांचे झाडे लागवड करणार आहेत जेणेकरून त्या झाडांचे सुगंध परिसरात दरवळून क्रीडांगणावर येणाऱ्या नागरिकांचे मन प्रसन्न व परिसर प्रफुल्लित राहणार आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!