भाविकांच्या सेवेत श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय – संपादक उदय तानपाठक
( श्रीशैल गवंडी,अ.कोट, दि.१७/०६/२०२५)
येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांसाठी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्तनिवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवाभाव या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने नियोजीत मुरलीधर मंदिर येथील दर्शन रांगेच्या माध्यमातून सर्व स्वामीभक्तांना लवकरच स्वामी समर्थांचे सुलभरीत्या दर्शन घेता येईल. यासह देवस्थानचे आध्यात्मिक धार्मिक सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेता नागरिकांच्या व भाविकांच्या सेवेसाठी श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचे मनोगत श्री.अंबिका वृत्तपत्र प्रकाशन समुहाचे मुख्य राजकीय संपादक उदय तानपाठक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेशइंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी संपादक उदय तानपाठक यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी संपादक उदय तानपाठक बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नगरसेवक नागराज कुंभार, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, श्रीकांत मलवे, धनराज स्वामी, संजय पवार, गिरीश पवार, प्रवीण देशमुख आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – संपादक उदय तानपाठक
यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!